



गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर: पोलिस ही जनतेचे रक्षक , देशसेवक वेळोवेळी संकटसमयी जीव की प्राण करणारे ,सतत कर्तव्य दक्ष असणारे अशा पोलिस बंधवानी अम्हा महिलांची सतत रक्षा करावी यसाठी तालुक्यातील झरपड़ा येथिल नव्याने निर्मित झालेले महिला सुरक्षा दल,तसेच नवनिर्वाचित महिला तमुस अध्यक्ष तसेच सदस्य यानी अर्जुनी मोर येथिल पोलिस स्टेशन मध्ये पोलिस बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.त्यावेळी तमुस अध्यक्ष रीता मेश्राम,निशा मस्के,तनुरेषा रामटेके,वालंबा गजभिए,अनिता मेश्राम पायल ठाकरे ,कंचन मेश्राम उपस्थित होत्या.