
तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथे राहत असलेल्या श्री.चषक अकरसिंग पटले यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे.चषक अकरसिंग पटले हा भंडारा जिल्ह्यातील पहिला लेफ्टनंट बनलेला आहे.त्यामुळे ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी गर्वाची आहे. चषक अकरसिंग पटले याची निवड 2019 साली झाली होती.त्यानंतर लेफ्टनंट पदाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पहिल्यांदा तुमसर तालुक्यात आगमन झाले असल्यामुळे मितेवानी येथे यांच्या सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित केले गेले होते.
त्यात राजमुद्रा ग्रुप तर्फे श्री.चषक अकरसिंग पटले यांना शाल श्रीफळ व मोमेंट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजि.सागर गभने,उपाध्यक्ष सागर भुरे,शुभम बाणासुरे,राहुल रणदिवे,अर्पित खानोरकर, फिरोज शेख उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663