
तुमसर प्रतिनिधि:- राजमुद्रा ग्रुप महिला मंडळातर्फे रविवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.
मकरसंक्रांतीनिमित्त रविवारी संताजी मंगल कार्यालयात समाजातील राजमुद्रा महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकासोबत ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह 250 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहिली. मेळावा यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा ग्रुप महिला मंडळ चे मिरा भट,मीनल निमजे,सुलभा हटवार, ल्लवी निनावे,अश्विनी बडवाईक,श्रुती कावळे,विद्या गभने,रजनी खानोरकर व समस्त राजमुद्रा महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले तर राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजि.सागर गभने,सुभम बाणासुरे,योगेश आजापूजे,राहुल रणदिवे,स्वप्निल डुंबरे,अर्पित खानोरकर,अनुज तिडके यांनी सहकार्य केल.





Total Users : 879218
Total views : 6482663