
भंडारा प्रतिनिधि/ महाराष्ट्र विधानसभेचे स्पीकर राहुल नार्वेकर यांनी आज एक ऐतिहासिक निर्णय दिला मुळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता तसेच शिंदे साहेबांचा गट हीच खरी शिवसेना म्हणून घोषणा केली.त्या निर्णयाचा सर्व शिवसैनिकांनी आज बहुसंख्येने उपस्थित राहून गांधी चौकामध्ये जल्लोष साजरा केला. त्यात प्रामुख्याने जिल्हाप्रमुख अनिलजी गायधने, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे शहर प्रमुख मनोज साकुरे शहर संघटक नितीन धकाते, बंडूभाऊ हटवार, अजिज शेख, प्रकाश गोन्नाडे, शुभम बर्वे, दिनेश भजंकर,प्रकाश देशकर,सतीश तुरकर,दिनेश गजभे,दिनेश भुरे, भुषण गभने, बंटी मिश्रा, सुनील साकुरे, कृष्णा ठवकर, प्रवीण कळंबे, श्रीकांत पंचबुद्धे,अजय तांडेकर,उमेश लांजेवार व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663