
तुमसर प्रतिनिधि/ 20 जानेवारी रोजी :- डॉ. परिणय फुके तर्फे दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00ते 2.00 वाजता स्थानीय राजाराम लॉन तुमसर सभागृहात व मोहाडी येथील वंजारी लॉन व सभागृह* येथे दुपारी 3.00 वाजता संक्रांत मेळाव्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. सगळ्या सखींना जेवण व गिफ्टच्या स्वरूपात वाण देण्यात आले. यामध्ये सर्व स्पर्धकांनी सखीने आपापल्या विभाग प्रतिनिधीकडे आपल्या नावाची आधीच नोंद केली होती. संक्रांत मेळाव्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये
1) उखाणे स्पर्धा
2) ब्लॅक मॅचींग स्पर्धा )
3) नऊवारी फॅशन शो
4) वन मिनिट गेम शो: असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.त्यामध्ये तुमसर व मोहाडी येथे आयोजित कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी डॉ.परिणिता परिणयजी फुके, गीताताई कोंडेवार,कल्यानीताई भुरे जिल्हाध्यक्ष ,कुंदाताई वैद्य जिल्हा महामंत्री, धुरपताताई मेहर जि.प.सदस्या, प्रीतिताई मलेवार, प्रियंका कटरे, छायाताई डेकाटे नगराध्यक्षा मोहाडी, निशाताई पशीने, दिशाताई निमकर नगरसेविका, सविताताई साठवणे,अस्विनीताई डेकाटे, वीणाताई मारबते, प्रचिताई पटले, निलिमाताई ईलमे सरपंचा,सुवरणाताई काटवले, उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663