
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक: माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना मरणोपरांत सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न मिळाल्याबदल दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ ,रोज शुक्रवारला कविकुलगुरू इंस्टिटयूट ऑफ टेक्नात्माजी अँड सायंस (किटस) मध्ये संस्था सचिव व्ही. श्रीनिवास राव यांचे हस्ते पी.व्ही. नरसिंहराव यांचा प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, प्रोजेक्ट ऑफीसर आर. श्रीनिवास राव , कुलसचिव पराग पोकळे, ग्रंथालय प्रमुख अंज्या रेड्डी, विविध विभागाचे विभाग प्रमुख, डीन, तसेच मोठया प्रमाणात प्राध्यापक, टेक्निकल स्टाफ व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे पी.ही. नरसिंहराव यांनी १९८४ ते १९८९ मध्ये रामटेक लोकसभेचे नेतृत्व केले. १९९१ ते १९९६ पर्यंत पंतप्रधान राहीले व त्यांच्या काळात भारताच्या नविन आर्थिक सुधारणाची सुरुवात झाली. रामटेक लोकसभेचे खासदार असताना किट्स रामटेकच्या स्थापने मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. या शिवाय या परिसरात त्यांच्या पुढाकाराने मौदाजवळ औद्योगीक क्रांतीची सुरुवात झाली.





Total Users : 878792
Total views : 6481922