
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- पारशिवनी तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाऊलवाट फाऊंडेशन द्वारा युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या डॉ. धीरज धोटे आणि डॉ. आकाश गोमकाळे या पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांचा महात्मा गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
डॉ.धीरज पुरुषोत्तम धोटे हा पारशिवनी तालुक्यातील गरंडा या छोट्याशा गावातील युवकाने यूपीएससी द्वारा घेण्यात आलेल्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करून वर्ग एकचे पद प्राप्त केले. तसेच पारशिवनी तालुक्यातीलच पारडी या छोट्याशा गावातील डॉ. आकाश प्रकाश गोमकाळे या युवकाने एमपीएससी द्वारा घेण्यात आलेल्या राज्यसेवा राजपत्रित अधिकारी वर्ग १ या गटातील परीक्षेत यश प्राप्त करून पशुधन विकास अधिकारी या पदावर निवड झाली. त्यांच्या या यशाचा गौरव व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पाऊलवाट फाऊंडेशन द्वारा प्रसिद्ध साहित्यिक, पुरातत्त्व अभ्यासक तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. मनोहर नरांजे आणि समीक्षक तथा वक्ते डॉ.जगदीश गुजरकर यांचे हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परसराम राऊत, मानव एकता मंचचे संयोजक डॉ. इरफान अहमद, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (बापू) पाटील तरार प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाऊलवाट फाऊंडेशनचे सचिव खुशाल कापसे, सूत्रसंचालन कवी, स्तंभलेखक डॉ. सावन धर्मपुरीवार तर आभारप्रदर्शन पाऊलवाट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.चेतक इटनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अरविंद दुनेदार, विकास ढोबळे, विजय भुते, राजू भोयर, रुपेश खंडारे, सचिन सोमकुवर, कृष्णा चावके, ओंकार पाटील, प्रशांत बठ्ठे, अर्पित कापसे यांनी परिश्रम घेतलेत.





Total Users : 879218
Total views : 6482663