
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चोरबाहुली परीसरात दिनांक 16 फरवरी ला दुपारच्या सुमारास सिमेंट रस्त्याला पट्टे मारणाऱ्या वाहनाला भीषण आग लागून वाहनात असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण वाहन जळून राख झाले. यात कुठलीही जीवित हानी झाली नसून स्फोट इतका भयानक होता की, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एस.टी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला कॅटलाईन पट्टे मारण्याचे काम सुरू असुन थेमरोप्लास्टिक गरम करीत असताना पाईप फाटला असल्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच अचानक मशिनने पेट घेतला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना शक्य झाले नाही. अचानक आग वाढू लागल्याने कर्मचारी वाहनांच्या दूर झाले. वाहनात गॅस सिलेंडर असल्याने काही वेळातच एक जोरदार स्फोट झाला, झालेला स्फोट इतका भीषण होता की, अक्षरशः विरुद्ध दिशेने येणाऱ्या एस.टी. बसमधील प्रवासी पूर्णपणे घाबरून गेलेत. मात्र यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना देण्यात आली. टोल व्यवस्थापक अतुल आदमने यांच्या मार्गदर्शनात गजेंद्र लोखंडे यांनी तात्काळ फायरब्रिगेट ची गाडी बोलावून आगीवर नियंत्रण मिळविले. व जळालेले वाहनाला रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली.





Total Users : 879218
Total views : 6482663