
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरणवार
रामटेक:- गट ग्रामपंचायत – कांद्री
तालुका – रामटेक अंतर्गत मागील बऱ्याच कालावधीपासून जनसेवेचे कार्य करणाऱ्या सौ. रजनीताई बर्वे रा.- कांद्री यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसहित
मा. श्री राजेंद्रजी मुळक साहेब, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या कुशल नेतृत्वावरती विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.यावेळी सौ. रजनीताई बर्वे यांना रामटेक तालुका महिला काँग्रेस कमिटी च्या उपाध्यक्षा पदाची जबाबदारी देण्यात आली.यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रामुख्याने सौ सोनालीताई मावळे, श्रीमती रेणुकाताई तम्मलवार, श्रीमती मीराताई मसराम, श्रीमती गीताताई सावजी, सौ रीताताई बर्वे, सौ शालूताई चंदनबटवे, सौ सरोजताई मोरेशिया, श्रीमती सयात्राताई चंदनबटवे इत्यादी प्रमुख महिला उपस्थित होत्या.





Total Users : 879218
Total views : 6482663