
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- रामटेक विधानसभा क्षेत्रातील पारशिवनी तालुक्यातील वराडा येथील युवक व महिलांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या विचाराने व आचरणे प्रेरित होऊन तसेच रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून पारशिवनी तालुक्यातील वराडा येथील युवक व महिलांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी उपस्थितीतांना रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल बरबटे सह मंचावर उपस्थित मान्यवरांनी संबोधित करून पक्ष प्रवेश घेणाऱ्या सर्व युवक व महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री. प्रेमकुमार रोडेकर, लोकसभा सहसंपर्क प्रमुख श्री. उत्तम कापसे, विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री. सुत्तम मस्के, युवासेना जिल्हा प्रमुख श्री. लोकेश बावनकर, तालुका प्रमुख श्री. कैलास खंडार, विधानसभा संघटक श्री.रमेश तांदुळकर, उपतालुका प्रमुख श्री. सुनील सहारे, टेकाडी सर्कल प्रमुख श्री. जितेंद्र जांबे व पक्ष सहकारी श्री अरविंद भालेराव उपस्थित होते.
यावेळी वराडा येथे शाखा उदघाटन सुद्धा करण्यात आले असून गावचे शाखा प्रमुख श्री. शिशुपाल घोडमारे तर उपशाखा प्रमुख श्री. हेमंत गिरी यांना करण्यात आले. शाखा सचिव पदी श्री. सेवक पुंड, कार्याध्यक्ष पदी अरविंद भालेराव तर कोशाध्यक्ष पदी मंगेश सयाम यांची निवड करण्यात आली सोबतच शिवाजी मडावी,नेताजी घोडमारे,प्रकाश सोनकुसरे,प्रवीण सहारे,नंदू घोडमारे शुभम पुंड,आयुष्य वाढई,शुभम मेश्राम,वेदांत लंगडे,प्रणय लंगडे,प्रमोद वरखडे,विष्णू वाढई,आशिष वरखडे,अनुप उके सह आश्रय मेश्राम अनेक युवक उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663