
प्रतिनिधी/ मुनिश्वर मलेवार
मोहाडी तुमसर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अजूनही कायम आहेत योजनेपासून वंचित नागरीकांना वर्षात अजूनहीं घरकुल मिळाले नाही शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार असे आश्वासन कितीदा मिळालेत परंतु पाठपुरावा होऊ शकला नाही शेतकऱ्यांना आज पर्यंत वीज पुरवठा वेळेवर झालेला नाही,ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाण्याची व जल सिंचन समस्या कायम आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पीक घेण्यास अडचणी कायम आहेत. हिंसक वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान होते त्या संदर्भात कोणतेही ठोस निर्णय वन्य प्राण्यांचा बंदोबस्त अजून पर्यंत झाले नाही जिल्ह्यात मोठ मोठे लोकप्रतिनिधी होऊन गेले परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास होऊ शकले नाही केवळ आश्वासनांचे आधारे लोकप्रतिनिधी निवडणूक लढत असतात ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगारांना अजून हि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाले नाही या विषयावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नी खंबिर पने मागणी केले नाही त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या कायम आहेत कामगाराच्या सुविधे विषयी ठोस निर्णय कधीच घेण्यात आले नाही त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढते समस्या पूर्ण पने सोडविण्याचे ठोस आश्वासन उमेदवारांनी दिले पाहिजे अशी मागणी मोहाडी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष चिंतामण तीबुडे यांनी केली आहे
या सगळ्या मुद्दवर प्रहार शेतकरी संघटना भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभेसाठी उभे असलेल्या उमेदवार यांच्यासमोर ठेवण्यात येईल त्यानंतरच जो शेतकऱ्यांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे , वंचिताचे इत्यादी समस्या सोडवण्याकरिता जनसामान्याच नेतृत्व करणारा उमेदवार असल्यास त्यांचं पाठीशी प्रहार शेतकरी संघटना राहणार असे मत मोहाडी तालुका चे अध्यक्ष चिंतामण तिबुडे यांनी व्यक्त केले आहे





Total Users : 879218
Total views : 6482663