
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
माडगीः येथील ग्रामपंचायत सभा मंडपात बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ ला सकाळी ११ वाजतापासून महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला परिसरातील सर्व नागरिकांनी, महिलांनी, मुलांना आणून प्रत्येक रोग निदान शिबिर उत्साहात तपासणी करून उपचार घेण्याची कृपा करावी असे आयोजन आ. राजू कारेमोरे व मित्र परिवार यांनी केले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकळी सरपंचा शामकला चौधरी, उद्घाटक माडगी सरपंचा ज्योती मालाधरे, प्रमुख पाहुणे जि. प. सभापती राजेश सेलोकर, जि. प. सदस्य महादेव पाचघरे, देवेंद्र शहारे, जि.प. सदस्य देवसिंग सव्वालाखे, मंगला कणपटे, सुधाकर कहालकर, उपसरपंच ज्ञानेश्वर कांबळे, नाना माहुले, बबलू जमजारे, सरपंच सुषमा भोयर, आशिष टेंभूरकर, विजय ठवकर, महेश कहालकर, वंदना कुंभारे, पो. पा. तेजस मालाधरे, श्रीधर हिंगे, फुकट हिंगे, पं. स. सदस्य मनोज झुरमुरे, मीनाक्षी शहारे, सुभाष सेलोकर, प्रदीप नागपुरे, अश्विनी भोयर, अण्णा नीमपांडे, डॉ. विलास रहांगडाले, डॉ. मोनिका बोपचे, तलाठी कोकुडे व परिसरातील सर्व ग्रा. पं. सदस्य, पदाधिकारी, नागरिक यांनी महाआरोग्य रोगनिदान शिबिर उत्साहात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आ. राजू कारेमोरे व मित्र परिवार यांनी केले आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663