![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण लहान असताना तुमचं विश्व फक्त तुमच्या घर आणि शाळेपुरतं मर्यादित असतं. जिथे आईवडील, शिक्षक, मित्रमंडळी तुमच्यासोबत सदैव असतात. मात्र पुढे कॉलेज, नोकरी, व्यवसायात तुमच्या विश्वात अनेक लोकांची सतत भर पडत जाते. सहाजिकच तुमचं विश्व दिवसेंदिवस वाढत जाते. जीवन जगताना प्रत्येकालाच चांगले आणि वाईट असे अनेक अनुभव वाट्याला येतात. लहान असताना पालक आणि शिक्षक तुमच्या मदतीला असतात. मात्र मोठं झाल्यावर अनेक गोष्टींना एकट्यानेच सामोरं जावं लागतं. खरंतर याचवेळी तुमच्या व्यक्तिमत्वाला खरे पैलू पडत असतात. कारण या वयातच माणसं खऱ्या अर्थाने जगणं शिकतात. प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास स्वतःच घडवावा लागतो. जीवन संंघर्षात प्रभावी व्यक्तिमत्व नेहमीच यशस्वी होतात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वातून अनेक गोष्टी त्यांच्यासाठी सोयीच्या होत जातात असे मार्गदर्शन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे व सदस्य अंकुश गभणे यांनी उपस्थितांना केले यावेळी छञपती शिवशंभू प्रतिष्ठान करडी सर्कल चे सदस्य प्रवीण कनपटे, आकाश बांते विद्यालयाचे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.