
इंडियन हैडलाइन न्युज/ तिरोडा प्रतिनिधी
तिरोडा:- दिनांक ०९ सप्टेंबर रोज सोमवारला मध्यरात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस आल्याने मोठया प्रमाणात नदी नाल्यांना पूर येवून पुराचे पाणी शेतक-यांच्या शेतात साचले असल्याने उभ्या धानपिकाचे नुकसान झाले तसेच कित्येक जागी घरेसुद्धा पडली याची दखल घेत आमदार महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्राद्वारे तातडीने पंचनामे करण्याबाबत निर्देश दिले असून आमदार महोदयांनी स्वत: नुकसानग्रस्त गावात स्वत: जाऊन मौक्याची तपासणी केली आहे व सोबतच पंचायत समिती तिरोडा येथे संबधित गावातील ग्रामसेवक, कृषी सेवक, व तलाठी यांच्या सोबत आढावा बैठक घेतली यामध्ये अतिवृष्टीमुळे नदी व नाल्याकाठी असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याचे निर्दसनास आले आहे त्यामुळे सदर नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तसेच नुकसानग्रस्त शेतक-याची प्राथमिक यादी ग्रा.प.ला सादर करण्यात यावी तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात यावी असे निर्देश आढावा बैठकीत आमदार महोदयांनी दिले या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, प्र.तहसिलदार अजय संकुदरवार,तालुका कृषी अधिकारी गेंदलाल उके,प्र.गटविकास अधिकारी शितेश पटले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, गोरेगाव उपसभापती राजकुमार यादव, मा.उपसभापती सुरेंद्र बिसेन व संबधीत गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663