
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील साध्या भोळ्या मतदार बांधवांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी या विधानसभा मतदार
संघाचा मतदार बांधवांना अपेक्षित असलेला विकास केला नाही त्यामुळे भंडारा विधानसभा मतदार संघ मागासलेला असून विकासाच्या आलेखात पिछाडीवर असल्याने भंडारा पवनी विधानसभा मतदार संघात विविध क्षेत्रात विकास कामे करण्यास मोठा वाव आहे.त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत सुजाण मतदार नागरिकांनी वेळीच दखल घेऊन तथा सम्यक विचार विनिमय करून मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिल्यास भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविणार असा निर्धार केला असून सर्वांनी याची खात्री बाळगावी अशी ग्वाही जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभेप्रसंगी दिली.
भंडारा पवनी तालुक्यात धान उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती करतात परंतु शेतमालावर आधारित
उद्योग धंदे नाहीत . वन आणि खनिज संपत्तीची नैसर्गिक देण आहे परंतु या संपत्तीवर आधारित उद्योग धंदे स्थापन करण्यात आले नाहीत पवनी तालुक्यातील एम आय डी सी एरियात एकही उद्योग आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही. भंडारा तालुक्यातील एम आय डी सी परिसराचा विस्तार करण्यात आला नाही.प्रकल्प ग्रस्त,पूर ग्रस्त,अभयारण्य ग्रस्त नागरिकांचे पूर्ण पणे
पुनर्वसन व पुनर्स्थापना करण्यात आली नाही.
मतदार बांधवांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी या मतदार संघाचा पाहिजे त्या प्रमाणात औद्योगिक विकास केला नाही त्यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.
त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाची व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करून पवनी तालुक्यातील एम आय डी सी एरियात उद्योग स्थापन करण्यात येतील.भंडारा तालुक्यातील
एम आय डी सी परिसराचा विस्तार करण्यात करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना प्रथम प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाईल . सर्व धर्माच्या धार्मिक ऐतिहासिक प्रेरणा स्थळांचा विकास केला जाईल.जिल्हा परिषदच्या प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यास पुढाकार घेण्यात येईल .एकंदरीत रस्ते,पुल,पाणी,वीज,शिक्षण,उद्योग या समकक्ष इतर क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाकडे आग्रह धरण्यात येईल.जनता जनार्दन मतदार बांधवांना विश्वासात घेऊन विकास करण्यास कटीबद्धता बाळगत आहे. प्रचार सभेत संबोधतांना जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे पुढे म्हणाले की मी पुरोगामी विचार सरणीचा
पुरस्कर्ता आहे त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत सर्वसामान्य जनता यांच्या समस्या ,प्रश्नांची जाणीव आहे.सर्व सामान्य जनता हीच माझी सर्वस्व शक्ती आहे .शेतकरी शेतमजूर कामगार भूमीहीन सुशिक्षित बेरोजगार , गोरगरीब जनतेला मी प्रमाण मानले आहे.त्यामुळे मला निवडून आणण्यासाठी ,विजयी करण्यासाठी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ,मित्र मंडळी,हितचिंतक,जनता जनार्दन शर्तीचे प्रयत्न करीत आहेत याचा मला विश्वास असून सार्थ अभिमान आहे. भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी स्वतः निर्धार केला आहे आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी वेळीच दखल घेऊन ठाम निर्धार करून परिवर्तन करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले. प्रचार सभेत पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शेतकरी शेतमजूर कामगार भूमीहीन सुशिक्षित बेरोजगार बहुसंख्येने उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663