BREAKING NEWS
ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर) प्रयागराज में सामूहिक विवाह ,अखिल भारतीय कवि सम्मेलन: कैलाशी शिव चरण हांड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन
ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर) प्रयागराज में सामूहिक विवाह ,अखिल भारतीय कवि सम्मेलन: कैलाशी शिव चरण हांड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन विकास के लिए जनता महायुति को चुनेगी मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, निधि को लेकर कोई भेदभाव नहीं: आ. डॉ. परीनय फुके हर शहर के लिए ठोस विकास की योजना तैयार “CM का प्रतिपादन अफवाह से रहे दूर रहे” भंडारा के विकास कार्य के लिए धन की कोई कमी नहीं होने दूंगा नानाभाऊ पटोले, पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल, दिलीपभाऊ बन्सोड एवं सांसद डॉ. प्रशांत पडोले के नेतृत्व में सचिन गोविंदभाऊ शेंडे ने गोंदिया नप नगराध्यक्ष पद हेतु दाखल किया नामांकन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

बोटांनी बोलण्याच्या काळात ओठांनी बोलावे – श्री जयंत चावरे

(एस एन मोर महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम)

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर : “आज माणसा माणसांमधील संवाद कमी झाला आहे. तरुण पिढी तर मोबाईल वरून फक्त बोटांनीच बोलत आहे. परंतु आज मानवी नाते जपून ओठांनी हृदयाची भाषा बोलण्याची खरी गरज आहे.” असे प्रतिपादन विदर्भातील प्रसिद्ध कवी व वक्ते श्री जयंत चावरे (यवतमाळ) यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयाचा ‘अंतरंग २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख अतिथी म्हणून श्री जयंत चावरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री राजूभाऊ कारेमोरे हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून मा. श्री योगेश भाऊ सिंगनजुडे (माजी नगरसेवक, तुमसर नगर परिषद) मा. श्री देवचंद (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) हे उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ कोमलचंद साठवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या कार्यक्रमास गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा. वर्षाताई पटेल, मा. श्री प्रफुलभाई पटेल, संस्थेचे सचिव मा. श्री राजेंद्र जैन व संस्थेचे संचालक मा. श्री निखिल जैन यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये श्री जयंत चावरे यांनी ‘आसू आणि हसू’ या विनोद व भावनिक गांभीर्य यांचे मिश्रण असलेल्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थित त्यांची मने जिंकली.

‘अंतरंग २०२५’ या दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बौद्धिक व सांस्कृतिक अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील क्रीडा विभागाकडून वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कबड्डी, क्रिकेट, बॅटमिंटन, चेस इत्यादी अनेक खेळांचा समावेश होता. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे गायन, नृत्य, नाटक, मेहंदी, रांगोळी, वादविवाद, निबंध, प्रश्नमंजुषा, वेशभूषा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच विशेष उपलब्धी प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी प्राचार्य डॉ कोमलचंद साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस वितरण समारोह घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री सुधाकर झलके (उपायुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, भंडारा) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्रीडा विभागाचे संचालक डॉ संजय आगाशे तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डाॅ राधेश्याम दिपटे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी व कार्यकारी प्राचार्यांच्या हस्ते गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ रेणुकादास उबाळे, डाॅ संतोष चौधरी व कनिष्ठ महाविद्यालयातील श्रीमती रजनी गायधने यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ कोमलचंद साठवणे यांनी केले. तसेच प्राचार्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विशेष परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डाॅ अरुणा बावनकर व डॉ राजेश दिपटे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:22 pm, Dec 12, 2025
temperature icon 27°C
clear sky
17 %
1012 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 5:52 pm

Our Visitor

8 7 9 7 8 4
Total Users : 879784
Total views : 6483690

Our Visitor

8 7 9 7 8 4
Total Users : 879784
Total views : 6483690
error: Content is protected !!