
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ गोंदिया प्रतिनिधि
गावातील 6 महिलाभगिनीनी अर्ज नोंदविला होता व सगळ्या शिक्षित होत्या त्यामध्युन ग्राम सभेचे निर्णयानुसार गावातील नागरिकांनी व महिला भगिनी यांनी कृषी ताई माया बिसेन यांची निवड केली ग्रामपंचायतीने सामाजिक दायित्व निभावत, कृषी सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या विधवा महिलेला संपूर्ण गावाच्या सहकार्याने व एकमताने निवडून दिले.
ग्रामसभेमध्ये गावातील नागरिक, महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या निवडीत कोणताही विरोध नोंदवण्यात आला नाही, त्यामुळे सदर निवड ही निर्विरोध झाली. हा निर्णय महिलांना, विशेषतः विधवा महिलांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतो. या प्रसंगी सरपंच अरुण बिसेन, उपसरपंच राजकुमार सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर राऊत, नमिता राऊत, उषा बिसेन, उषा भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ही निवड ग्रामीण भागात महिला सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी पाऊल ठरली आहे.





Total Users : 878791
Total views : 6481921