



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ मोहाडी प्रतिनिधि
मोहाडी : शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था, मित्रमंडळ, महिला भगिनी तर्फे एकलारी येथे दि. ६ जून २०२५ शुक्रवार ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार समारंभकार्यक्रम सार्वजनिक हनुमान मंदिर एकलारी येथे आयोजित करण्यात आले. १९ विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आ. राजू कारेमोरे, जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, तुषार कमल पशिने (पत्रकार) तुमसर, पुरुषोत्तम उके जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकलारी, संतोषजी बालपांडे पोलीस पाटील एकलारी, पुनम बालपांडे उपसरपंच ग्रा. पं. एकलारी, ग्रामपंचायत सदस्य गिरधारी ठोंबरे, अश्विनी मारवाडे, सुशिला सेलोकर, छाया चामट, सरकारी स्वस्त राशन दुकानदार एकलारी, पुजा सार्वे मॅनेजर गारमेंट एकलारी, दुर्गा बालपांडे रोजगार सेविका एकलारी, मंजुषा बालपांडे, आशा रेहपाडे, वनिता भोवते, आशा सेविका एकलारी, परमेश्वर हटवार, कैलाश चव्हाण, दिनेश भिवगडे, राजेश नंदागवळी, सुशील खुळे, मंगेश सेलोकर, कमलेश गजभिये, सागर भोयर, पीयुष कुथे, ज्योत्सना तिडके, जयश्री ढोके, शालु बालपांडे, वैशाली वासनिक, देवका मारवाडे, तनुश्री सार्वे, तानिया आमटे, समिधा भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक शिवाजीराव ग्रामीणचे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल तेजराम भोयर यांनी आयोजित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अस्मिता भोयर यांनी केले व आभार प्रदर्शन शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अनिल आमटे यांनी केले.