



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला . राज्याभिषेक सोहळासाठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला या अलौकिक दिवसाची आठवण म्हणून आज दिनांक 6 जून 2025 रोज शुक्रवार ला न. प. बांगळकर शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पंचामृताच्या सहाय्याने अभिषिक्त मंत्रोच्चारनाच्या पवित्र वातावरणात शास्त्रोक्त पद्धतीने दीपप्रज्वलन, पूजन व माल्यार्पण करून सोहळा संपन्न झाला. राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 6 दिवसीय बालसंस्कार व शिवकालीन मर्दानी खेळांचा समारोप करण्यात आला यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी चित्त थरारक करामती, मनोरे व तलवारबाजी दांडपट्टा इत्यादी प्रात्यक्षिके सादर केले. उपरोक्त कार्यक्रमावेळी माजी खासदार श्री. मधुकरजी कुकडे, जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीपभाऊ सर्वे माजी नगराध्यक्ष गीता ताई कोंडेवार माजी नगरसेवक कुंदाताई वैद्य माजी नगरसेवक आशिष कुकडे श्री लक्ष्मीकांत सलामेजी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन व अल्पोपाहारा नंतर कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठानचे सचिव प्रा. अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवणे व प्रतिष्ठानचे निष्ठावान मावळे मनोज बोपचे,प्रशांत वासनिक, सोनू दुपारे, अंकित तुमसरे, हौसिलाल ठाकरे, युवणेश धांडे, सदानंद मोटघरे , प्रमोद देशमुख प्रिया दुपारे, सायली मोहतुरे ज्योती हेडाऊ, पूजा सिंगंजुडे इत्यादी व प्रशिक्षणार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते.