BREAKING NEWS
सर्ववर्गीय कलचुरी कलार समाज करेगा समाज के प्रतिभाशाली का सम्मान “विविध राज्यों से होगा पदाधिकारी का आगमन” अ.भा. हैहय कलचुरी महासभा का 90 वा स्थापना दिवस 2,3 अगस्त 25 को होगा कलचुरी भव्य महासम्मेलन “देश विदेश से जुंटेंगे लाखों प्रतिनिधि” चेतना तिडके यांची एन.एफ.एस.भारत सरकार पदावर उपकुलसचिव पदी नियुक्ती सावन माह में कोटा शहर में निकलेंगी कई स्थानों से कांवड यात्रा “सुरक्षा की मांग को लेकर कांवडिया सेना संगठन राजस्थान ने आईजी को दिया ज्ञापन” बस स्टैंड पर मेहताब सिंह ठाकुर का सख्त रुख – बच्चों की समस्याओं पर अब बर्दाश्त नहीं होगा अन्याय! समाज की प्रतिष्ठित महिला शीला जायसवाल जी का महासभा द्वारा स्वागत
सर्ववर्गीय कलचुरी कलार समाज करेगा समाज के प्रतिभाशाली का सम्मान “विविध राज्यों से होगा पदाधिकारी का आगमन” अ.भा. हैहय कलचुरी महासभा का 90 वा स्थापना दिवस 2,3 अगस्त 25 को होगा कलचुरी भव्य महासम्मेलन “देश विदेश से जुंटेंगे लाखों प्रतिनिधि” चेतना तिडके यांची एन.एफ.एस.भारत सरकार पदावर उपकुलसचिव पदी नियुक्ती सावन माह में कोटा शहर में निकलेंगी कई स्थानों से कांवड यात्रा “सुरक्षा की मांग को लेकर कांवडिया सेना संगठन राजस्थान ने आईजी को दिया ज्ञापन” बस स्टैंड पर मेहताब सिंह ठाकुर का सख्त रुख – बच्चों की समस्याओं पर अब बर्दाश्त नहीं होगा अन्याय! समाज की प्रतिष्ठित महिला शीला जायसवाल जी का महासभा द्वारा स्वागत कलचुरी समाज के प्रतिष्ठित व्यक्तियों का स्वागत वंदन अभिनंदन -ध्रुवचंद जायसवाल गृहमंत्री एवं जनगणना आयुक्त से मांग 28 से 29 कालम की जाए-ध्रुवचन्द जायसवाल वैश्य सुरक्षा आयोग का गठन होगा भामाशाह को सच्ची श्रद्धांजलि: अशोक चौधरी “प्रियदर्शी” कृषी पंपाला 12 तास विज मिळण्याकरिता 2 जुलै ला करडी येथील सब स्टेशन कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा धडकणार
ENGLISH INDIAN HEAD LINES CALENDER 2025
HINDI INDIAN HEAD LINES CALENDER 2025
No Slide Found In Slider.
INDUTAI COLLEGE ADD 2025
JAYANTI-BHAI-JWELLERS-TUMSAR-300x240

जपानसारख्या विकासासाठी होणार प्रयत्न:- डॉ. परिणय फुके

परदेशात केलेला अभ्यास राज्याच्या मातीत उतरणार:- देवेंद्र फडणविस

PRESS SANGATHAN ID CARD 2025

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि 

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपान दौऱ्यातील तंत्रज्ञान, शिस्त आणि बुलेट ट्रेनचा अनुभव मुख्यमंत्र्यांशी शेअर केला.  आपल्या अभ्यास दौऱ्यातून माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपानमध्ये टिपलेले बारकावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर केले. दोन नेत्यांच्या या संवादातून राज्याच्या मातीत जपानसारखा विकास होण्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी बारकाईनं अभ्यास केला. जपानचं तंत्रज्ञान जाणून घेतलं. विकासाची प्रक्रिया माहिती करून घेतली. यातील प्रत्येक बाबीवर त्यांनी देवाभाऊंसोबत चर्चा केली. 

जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी अनेक स्थानिक अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. महाराष्ट्रासाठी त्यातून काय घेता येईल, यावर विचारमंथन केलं. जपानमधूनन परत येताच क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली निरीक्षणं मांडली. डॉ. फुके यांनी जपानमध्ये तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती घेतली. जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचा देखील अभ्यास केला. शिंकान्सेन बुलेट ट्रेनचा प्रवास, जपानच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळांची कार्यपद्धती, तसेच रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रातील नवकल्पना याचा त्यांनी अनुभव घेतला. 

महाराष्ट्रात तंत्रज्ञान विकास

महाराष्ट्रासाठी त्यांनी या तंत्रज्ञानाचा आणि शिस्तीचा उपयोग कसा करता येईल, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विचारमंथन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी जपानमधील तंत्रज्ञान आणि विकास महाराष्ट्रात कसा आणता येईल, यावर खोलवर विचारविनिमय करण्यात आला. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही असतात. नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ते करीत अससेले काम सर्वश्रूत आहे. आता त्यांना डॉ. फुके यांचीही साथ मिळणार आहे. 

फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत तेव्हा त्यांनी ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ प्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरचा कायापालट केला. मेट्रो प्रकल्प झपाट्यानं साकारला. रस्त्यांचा नवा आराखडा राबविला गेला. उड्डाणपुलांची मालिका तयार झाली. आता या विकासाच्या घोडदौडीमध्ये डॉ. परिणय फुके देखील सामील झाल्याचं दिसत आहे.

डॉ. फुके म्हणतात की, जपानची शिंकान्सेन बुलेट ट्रेन ही फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर एक पूर्ण जीवनशैलीचा अनुभव आहे. 513 किलोमीटरचा प्रवास 2 तास 15 मिनिटांत पूर्ण झाला. हा प्रवास गतीमान होता. आरामदायक आसन, व्यवस्था होती. वेळेचे काटेकोर पालन होत होते. जपानमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था हाच यशाचा मुख्य पाया आहे. भारतात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा प्रकल्प भारताच्या रेल्वे व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. डॉ. फुके यांच्या मते, या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवा वेग मिळणार आहे. महाराष्ट्रासाठीही या तंत्रज्ञानाचा समर्पक वापर केल्यास महानगरांच्या विकासाला गती मिळेल.

स्मार्ट सिटीचा आदर्श

डॉ. फुके यांच्या या पुढाकारानं आता नागपुरातून सुरू झालेली विकासाची गंगा अधिक वेगानं भंडारा, गोंदियापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. जपानमधील तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रासह आपल्या भागात कसा वापर करता येईल, यासाठी डॉ. फुके भविष्यात नक्कीच प्रयत्न करताना दिसण्याचे हे संकेत आहेत. डॉ. फुके यांचे या दिशेने नवे प्रयोग लवकरच दिसतील असे यावरून वाटते. नागपूरमध्ये मेट्रो, उड्डाणपूल, आणि रस्त्यांच्या नव्या स्वरूपामुळे शहराची ओळखच बदलली आहे. आता या विकास प्रक्रियेत डॉ. फुके यांनीही सक्रिय भूमिका घेतल्याचं दिसत आहे. जपानच्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा अॅक्शन प्लॅनवर फडणवीस आणि फुके यांनी एकमत व्यक्त केलं. यावर लवकरच कामही सुरू होऊ शकते. भविष्यात काही योजना आकारास येऊ शकतात. 

डॉ. फुके यांनी जपानमधील रोबोटिक्स, एआय-आधारित सुरक्षा प्रणाली आणि स्मार्ट विमानतळ यांसारख्या नवकल्पनांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जपानमधील हे तंत्रज्ञान भारतीय स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी आदर्श ठरू शकते. जपानच्या शिस्तबद्धतेची आणि तंत्रज्ञानाची संगम भारताच्या विकासासाठी नवीन आदर्श निर्माण करेल.

Leave a Comment

PRESS SANGATHAN ID CARD 2025
loader-image
BHANDARA GONDIA
11:45 am, Jul 9, 2025
temperature icon 27°C
overcast clouds
79 %
1007 mb
7 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:57 am
Sunset: 7:12 pm

Our Visitor

5 4 3 6 4 1
Total Users : 543641
Total views : 574012

Our Visitor

5 4 3 6 4 1
Total Users : 543641
Total views : 574012