



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त तुमसर येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे,संताजी मंगल कार्यालय येथे महारोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन ६ जून सकाळी १० ते २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम देण्यात येणार आहे. शिबिरामधे नेत्ररोग, त्वचारोग,स्त्रीरोग,बालरोग,अस्थिरोग संबंधित सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया निशुल्क होणार आहेत व डॉक्टरांच्या सल्ल्याने जवळचे चष्मे औषधी आय ड्रॉप निशुल्क वाटप होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरा चा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी शहराध्यक्ष यु.काँ. इंजि.सागर गभने व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.