
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात दिनांक २२ जून रोजी रात्रीच्या वेळेस एकाच वेळी सात दुकाने फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण व्यापारी वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, काही दुकानांतून रोख रक्कम, मोबाइल, किराणा साहित्य, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज एक शिष्टमंडळ तुमसर पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनात सदर चोरी, शहरातील गुन्हेगारी वाढ, व व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या घटना यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते…..
श्री. मेहताबसिंह ठाकूर, जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भंडारा जिल्हा, श्री. अनिल जिभकाटे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भंडारा जिल्हा, श्री. गौरव नवरखेले, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भंडारा जिल्हा, श्री. हेमराज नागफासे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तुमसर शहर, श्री. हेमंत मलेवार, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार, तुमसर शहर, श्री. सागर बिसने, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तुमसर शहर ओबीसी सेल, श्री. राकेश भेलावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, तुमसर शहर, श्री. प्रवीण कहालकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, तुमसर शहर
या शिष्टमंडळाने मागणी केली की पोलिसांनी तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करावी, शहरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही नेटवर्कचे जाळे बळकट करावे. तसेच व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन करावे, असेही यामध्ये नमूद आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663