
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था एकलारी चे अध्यक्ष सुनिल तेजराम भोयर व अस्मिता सुनिल भोयर यांनी आपल्या मुलीचा कृष्णाली चे पहिलाच वाढदिवस किल्ले रायगड येथे स्वच्छता मोहीम राबवून आनंदाने साजरा केला, तसेच मागील वर्षी सुनिल भोयर यांनी आपला वाढदिवस आंबागढ येथे 18 ते 20 मित्रांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली होती,वृदालय आश्रम टाकळी भंडारा येथे नाश्ता वाटप करून मार्गदर्शन केले होते, जि.प.उच्च प्राथमिक शाळा एकलारी येथे स्पर्धा परीक्षा घेवून सर्व विद्यार्थ्यांना गिफ्ट वाटप करून सहकार्य करतात,तसेच गावोगावी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर स्वतः आयोजित करण्यात खुप मोठा वाटा असते
त्यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्य काहीतरी नवीन सामाजिक संकल्पना खुप छान प्रेरणादायी दिसून येते.





Total Users : 879784
Total views : 6483690