
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: तुमसर नगर परिषद ने कार्यालयीन आदेश एकत्रित वाढीव मालमत्ता कर आकारणी नोटीस सन २०२५-२०२६ ते २०२८-२०२९ करीता मागणी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औदयोगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९ (१) (२) अन्वये केली असून,तुमसर शहरांमध्ये संपूर्ण मालमत्ता धारकांना नविन प्रस्तावित वाढीव मालमत्ता कर आकारणी नोटीस देण्यात आलेली आहे. परंतु केलेली नवीन मालमत्ता कर आकारणी खूपच जास्त अवाजवी असुन महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औदयोगिक नागरी अधिनियम १९६५ प्रमाणे सुसंगत नाही. तसेच नविन प्रस्तावित वाढीव मालमत्ता कर आकारणीचे सर्वेक्षण संबंधित यंत्रणेकडून अचुकरित्या झालेली नाही. मालमत्तेचे सर्वेक्षण करतांना संबंधित यंत्रणेकडून मालमत्ता धारकांशी कोणतीही चर्चा न करता व विश्वासात न घेता आकारणी केल्याचे निर्देशनास येते, त्यामुळे कर आकारणीमध्ये बरीच तफावत दिसुन येत असुन बऱ्याच नागरिकांच्या कर आकारणीमध्ये कितीतरी पटीने वाढ करण्यात आलेली असुन केलेली वाढ कोणत्याही प्रकारे सुसंगत नाही. त्यामध्ये बरीच तफावत असल्यामुळे मालमत्ता धारकांकडून बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत.तसेच सन २०२० मध्ये आलेल्या कोविड-१९ रोगाच्या साथीमुळे तुमसर शहरातील नागरिक अजूनपर्यंत आर्थिक विवंचनेतून सावरलेले नाहीत. त्यामुळे बऱ्याच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असुन तुमसर शहरांमध्ये औदयोगिक वसाहन व नागरिकांना नियमित रोजगार नसल्यामुळे बऱ्याच कुटुंबाना परिवाराचे पालन-पोषण
करणे फारच कठिण होत असून जिवण जगणे अवघड झालेले आहे. त्यामुळे केलेली नविन प्रस्तावित बाढीव मालमत्ता कर भरणे फारच कठिण असून सुसंगत नाही.सर्व परिस्थितीची आढावा घेवून नविन प्रस्तावित वाढीव मालमत्ता कर आकारणी रद्द करुन वाढीव कर आकारणीला स्थगिती दयावी, यास्तव आपणांस विनंती करण्यात येते की, उपरोक्त बाबींचा योग्य आढावा घेवून आवश्यक कार्यवाही अपेक्षित आहे, जेणेकरुन नागरिकांवर होत असलेला अन्याय दूर होईल असे आपल्या निवेदनात लिहले, यावेळी विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे,शहर अध्यक्ष योगेश सिंगणजूडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष यासिन छवारे, प्रदेश युवक सचिव प्रदीप भरणेकर, जिल्हा उपाध्यक्ष सरोज भुरे, महिला शहर अध्यक्ष पमा ठाकूर,मीना गाढवे, जयश्री गभने, नेहा मोटघरे, पूनम पाठक,नानू परमार, मुकेश मलेवार, हितेश चोपकर, नौशाद शेख, सुमित लोखंडे उपस्थित होतें.





Total Users : 879218
Total views : 6482663