
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: बुधवारी या मोहिमेची सुरुवात एका खास उद्घाटन कार्यक्रमाने झाली ज्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर गोटमारे (क्लस्टर मैनेजर) सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या वेन्सडे उपक्रमाद्वारे, स्मार्ट बाजार महिलांना स्टोअरमध्ये क्रियाकलाप, तज्ञ जीवनशैली सल्लामसलत आणि मैत्रीपूर्ण, आरामदायी वातावरणासाठी स्टोअरला त्यांचे प्राथमिक गंतव्यस्थान मानण्यास प्रोत्साहित करते. या आकर्षक अनुभवांसोबतच, वैयक्तिक काळजी, फॅशन, सौंदर्य आणि बरेच काही यासह विविध उत्पादनांमध्ये महिलांवर लक्ष केंद्रित झालेले दिसुन येथे!
स्मार्ट बाजार बद्दल
मनीष भांडारकर (स्टोर मैनेजर): रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रिटेल उपक्रम ‘स्मार्ट बाजार’ ही भारतातील एक मूल्यवान रिटेल साखळी आहे, जी परवडणारी क्षमता, ताजेपणा आणि श्रेणीवर लक्ष केंद्रित करून विविध उत्पादने ऑफर करते. स्टोअर ग्राहकांना वस्तूंची विस्तृत निवड प्रदान करतात आणि नियमितपणे विविध डीलद्वारे बचत देतात. स्मार्ट बाजारचे उद्दिष्ट गृहिणींना त्यांच्या खरेदी अनुभवात स्पर्धात्मक किंमत आणि सुविधा प्रदान करून त्यांची सेवा करणे आहे.
तुमसर सखी मंच चा सहभाग
कार्यक्रमात सखी मंच सखींसाठी अनेक मनोरंजन, सरप्राईज गेम, आणि लकी ड्रॉ (चिट्टी) कार्यक्रम आयोजित केले होते. सखी मंच ची रितु पशिने आणि नेहा मोटघरे यांनी सगळ्या महिलांना कार्यक्रमाचे सरप्राईज (स्मार्ट महिला बुधवार स्पेशल गेम) खेळवुन जे महिला विनर ठरले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले, कार्यक्रमात बहुसंख्य महिलांनी भाग घेतला आणि स्मार्ट बजार तर्फे प्रत्येक बुधवारी स्पेशल वुमन कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने महिलांनी आपली सहभागीता दाखवावी असे आवाहन करण्यात आले
इंडियन हेडलाइन न्यूज शी बोलताना, रिलायन्स स्मार्ट बाजार तुमसरचे चंद्रशेखर गोटमारे (क्लस्टर मैनेजर) म्हणाले की, तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील महिलांना पुढे आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह आणि प्रेरणा वाढेल!

कार्यक्रमाचे आयोजन समिती: मनीष भांडारकर, ओंकार गावंडे, पराग अरमारकर, यश गांधेवार, लीना भुजाडे, दुर्गेश्वरी भुरे, आसिका पशिने, श्वेता, रीना निंबालकर, प्रीति वाघाडे, मृणाली फुले, प्रीती लांजेवार, आणि कल्पना समरीत, अंजलि पशिने यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले





Total Users : 879217
Total views : 6482662