
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: मॉर्निंग वॉक ग्रुप तुमसरच्यावतीने देव्हाडी रोडवरील मॉर्निंग वॉक चौक येथे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ शंकर जयस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून शेठ नंदू जयस्वाल, मनोहर कुंदवानी, बाबा पटेल, प्राचार्य संतोष पाठक, प्रमुख वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे, विजय मुकुर्णे, माजी मुख्याध्यापक राजुभाऊ चामट, तारेंद्र डिंकवार, संदीप पेठे, शिवभाऊ पडोळे व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मुकुर्णे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे यांनी आपल्या भाषणातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे आजच्या काळातील संदर्भाने विश्लेषण केले. त्यांनी नमूद केले की, “अहिल्याबाईंनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी न्याय, सुसंस्कृत प्रशासन, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक समतेचे जे तत्त्वज्ञान उभे केले, ते आजही मार्गदर्शक आहे. मॉर्निंग वॉक ग्रुपने या जयंतीच्या निमित्ताने केवळ अभिवादन नव्हे, तर त्यांच्या विचारांची आजच्या पिढीत पेरणी करण्याचा जो उपक्रम राबवला, तो खरोखर प्रेरणादायी आहे.”
आजच्या व्यवस्थेत अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे अनुकरण करत पुढील उपाय समाजाभिमुख ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले – स्त्रीशक्ती सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी लोकसहभाग, सांस्कृतिक वारशाचे जतन, पर्यावरणपूरक उपक्रम व सर्वसमावेशक शिक्षण हेच खरे अहिल्याबाईंचे आधुनिक स्वरूप आहे.” न्याय, सेवा,समता, प्रशासन आणि श्रद्धा यांचा संगम म्हणजे अहिल्यादेवी होळकर. त्यांचे विचार केवळ ऐकण्यापुरते न ठेवता कृतीत आणले ,तर.सामाजखरे प्रगत होईल,”.असे प्रांजळ मत प्राचार्य राहुल डोंगरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पेठकर यांनी केले.आभार प्रदर्शन अजित सव्वालाखे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष बेलूरकर, वासू चरडे, गणेश वंजारी, विनोद मलेवार, विकास परिहार, रोहित अग्रवाल, मुरली खंडेलवार, कुँजीभाई, विजय केवट, संजय अग्रवाल, रूपराम हरडे, सुधाकर आगाशे, राजू आगाशे, श्री. लांजेवार, श्री. दमाहे, हुकुमचंद झुरमुरे,संतोष गुप्ता ,श्री चव्हाण,प्राचार्य मस्के, श्री. आकरे,श्री राजकुमार परिहार,श्री आंबीलढुके,वामन टिचकुले, व इतर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी विशेष योगदान दिले.





Total Users : 879218
Total views : 6482663