



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ गढ़चिरौली प्रतिनिधि
कुरखेडा: श्रीरामनगर, वृंदावन कॉलनी कुरखेडा येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा वटसावित्री पौर्णिमा निमित्त सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने धमदीटोला येतील मोलमजुरी करणाऱ्या भगिणी, विधवा भगिणी सोबतच वृंदावन कॉलनी येतील सुहासिनी महिलांच्या उपस्थितीत करंजीचे रोपटं लावून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. सोबतच मोलमजुरी करणाऱ्या व विधवा महिलांना हळदकुंकू लावून त्यांच्या सोबत स्नेहबंधनाचे धागे विणण्यात आले.त्या शुभ प्रसंगी वृंदावन कॉलनी येतील संगीता ठलाल, रेखा मोहणे, वैशाली कुमरे, तेजस्विनी कुमरे रामगढ येतील अश्विनी कोल्हे, धमदीटोला येतील अहिल्या कपूर,बेनू कपूर,मंगतीन कपूर,रेखा कपूर प्रामुख्याने उपस्थित होते.