
गोंदिया: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय गोंदिया येथे स्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्य तिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी डॉ तृप्ती कटरे डॉ पवन राऊत डॉ गुरुप्रसाद खोब्रागडे एओ श्री भार्गवे डॉ सोनल आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा हुबेकर यांनी केले स्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला पुष्पहार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांनी अर्पण करून सुमनांजली अर्पित केली
या वेळी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दलित व श्रमिकांच्या उद्धारासाठी अण्णाभाऊ कायम प्रयत्नशील राहिले. आपल्या प्रभावी लिखाणातून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. ‘महाराष्ट्राची परंपरा’ या पोवाड्याच्या माध्यमातून ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ खोलवर रुजवणारे ख्यातनाम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यस्मरणदिनीआमचे विनम्र अभिवादन आहे. के टी एस चे मुकादम श्री लोखंडे श्री शैलेश यांनी सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.आरोग्य सेवा गोरगरीब वंचित रूग्णा पर्यंत पोहोचली म्हणजेच स्व लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे विचार डॉ सुवर्णा हुबेकर यांनी व्यक्त केले. नेत्र समुपदेशक भावना बघेले श्री अमोल राठोड व सर्व कार्यालयीन स्टाफ या वेळी उपस्थित होता.





Total Users : 879218
Total views : 6482663