
तुमसर: तालुक्यातील व शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावे लागतो प्रवास अनेक अपघात घडून देखील प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष लोकप्रतिनिधी फक्त आंबील मठ्ठा पाजण्यात व्यस्त तर जनता रस्त्यावरुन प्रवास करताना त्रस्त तुमसर :- तुमसर तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षर श:ह चाळण झाल्याचे चित्र आजघडीला आहे. प्रवास्यांना विशेष त:ह दुचाकी चालकांना यांच्या कमालीच्या त्रास सहन करावं लागतो परिणामी अनेक वेळेला अपघात होऊन अनेक लोकांना अपंगत्व तर काहींच्या मृत्यू देखील झाला आहे पण संबंधित विभागाला तसेच लोकप्रतिनिधी ना याचे गांभीर्य नसल्याचे पहायला मिळते. लोकप्रतिनिधी फक्त मठ्ठा पाजण्यात व्यस्त असतात तर अधिकारी भ्रष्टाचारात मग्न असतात. आणि इकडे जनता जनार्दन रस्त्यावर प्रवास करताना तारेवरची कसरत करते. निदान लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663