
गोंदिया: KTS जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत KTS जिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन मा सीता ताई रहांगडाले भाजपा जिल्हा अध्यक्ष गोंदिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते मा सीता ताई रहांगडाले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजित गोल्हार होते या वेळी प्रामुख्याने नेत्र मित्र श्री नरेश जी ललवाणी रक्त मित्र श्री विनोद चांदवणी सक्षम चे अध्यक्ष श्री प्रभाकर राव IMA चे डॉ मोहन ताप्ती सेवा समिती चे श्रीमान कालुराम अग्रवाल GMC चे वैद्यकीय अधीक्षक डॉ दिगंबर मरसकोले डॉ सुवर्णा हुबेकर डॉ जैस्वाल डॉ विजय कटरे डॉ पारधी डॉ धुवाधापरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.!
या कार्यक्रमाचे ऑनलाईन राज्यस्तरीय उद्घाटन वर्धा येथून आरोग्य मंत्री ना प्रकाशजी आबीटकर यांच्या शुभ हस्ते झाले हे विशेष!राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व उपचार करून मोतीबिंदूमुळे होणाऱ्या अंधत्वावर मात करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करून, आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती मा DHO डॉ अभिजित गोल्हार यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या या लोकहितवादी उपक्रमामुळे असंख्य नागरिकांना दृष्टी परत मिळणार असून, आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. तसेच, या उपक्रमामुळे दृष्टिहीनतेवर मात करून नवदृष्टी देणाऱ्या शासनाच्या प्रयत्नांना गती मिळेल, असा विश्वास उद्घाटिका मा सीता ताई रहांगडाले यांनी व्यक्त केला.तसेच, अधिकाधिक गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबिर संयोजिका डॉ सुवर्णा हुबेकर
यांनी या वेळी केले.
या उद्घाटनप्रसंगी गोंदिया विधानसभा व्हाट्सअप ग्रुप तर्फे नेत्र दानाचे अविरत चालणाऱ्या पुण्य कामा बद्दल नेत्रमित्र श्री नरेश ललवाणी यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ताप्ती सेवा समिती तर्फे नेत्र दानाचे पुण्य कार्याबद्दल श्रीमान कालुराम अग्रवाल यांना मा DHO अभिजित गोल्हार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मोतीबिंदू मुक्त गोंदिया
अभियानात NGO यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांनी केले.





Total Users : 879218
Total views : 6482663