
तिरोडा:आज राष्ट्रवादी काँग्रेस तिरोडा तालुका व शहर कार्यकर्ता बैठक भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी बहुउद्देशीय सभागृह, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. धापेवाडा व कवलेवाडा पाटबंधारे प्रकल्पातून हजारो हेक्टर शेतीला सिंचन मिळाल्याने शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास व उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास मदत झाली आहे.
आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिरोडा शहर व ग्रामीण भागात सभासद नोंदणी करावी. प्रत्येक बुथवर समित्या स्थापन करण्याचे व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवली तरच पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेची कामे प्राधान्याने केली पाहिजेत असे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, डॉ अविनाश जायस्वाल, अजय गौर, योगेंद्र भगत, केतन तुरकर, जगदिश बावनथडे, सलीम जवेरी, नरेश कुंभारे, किरण पारधी, राजेश गुनेरिया, नीता रहांगडाले, सुनीता मडावी, ममता बैस, मनोज डोंगरे, जितेंद्र चौधरी, विजय बिंझाडे, रिताताई पटले, खुमेश रहांगडाले, विजय बुराडे, राजेश श्रीरामे, संदीप मेश्राम, प्रभू असाटी, राजेश तुरकर, भोजु धामेचा, आंनद बैस, अतुल गजभिये, जगदीश कटरे, प्रशांत डहाटे, बबलू ठाकूर, साजन रामटेके, देवेंद्र चौधरी, किरण बन्सोड, थानसिंग हरिणखेडे, विजय बन्सोड, मनीषा पटले, बबन कुकडे, संजय किंदरले, किशोर पारधी, नागेश तरारे, पवन पटले, नेहा तरारे, दुर्गेश कडपती, मुकेश पटले, रितेश पटले, आशिष चौधरी, रश्मि बुराडे, मनोहर तरारे, राजेश तायवाडे, आरिफ पठाण,जगणं धुर्वे, श्यामराव उके सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663