
तुमसर: शहरात पारंपरिक पद्धतीने कावड यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या धार्मिक आणि सांस्कृतिक यात्रेमध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला. संपूर्ण शहरात हर हर महादेव आणि बोल बमच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. या कावड यात्रेच्या दरम्यान आमदार राजू भाऊ कारेमोरे साहेब स्वतः उपस्थित राहून यात्रेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भाविकांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
यात्रेदरम्यान शिस्तबद्ध मिरवणूक, भजन, कीर्तन, ढोल-ताशांचा गजर आणि महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस प्रशासन, स्वयंस्फूर्त कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे यात्रा शांततेत पार पडली.या वेळी प्रामुख्याने उपस्थित होतें आमदार राजु भाऊ कारेमोरे, देवचंद ठाकरे, यासिन भाऊ छवारे, योगेश सिंगणजूडे,प्रदीप भरणेकर, नानू परमार, हितेश चोपकर, रिंकू ठाकूर, मुकेश मलेवार, अविनाश पटले, कामेश बोपचे, प्रवीण भुरे, नौशाद शेख, आफताब रजा, संदीप पेठे,मिलिंद गजभिये,पिंटू डहरवाल, दीपेश गलबंले, सरोज भुरे, पमा ठाकूर, जयश्री गभने, नेहा मोटघरे, नंदा डोरले





Total Users : 879218
Total views : 6482663