
१९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत कामबंद / संप
📍 गोंदिया: जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु ठेवत आहेत.
🔹 शासनाने १४ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार समान काम, समान वेतन लागू करणे अपेक्षित होते, परंतु आजतागायत याची अंमलबजावणी झाली नाही.
🔹 उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आहे.
🔹 आरोग्य सेवा विस्कळीत होत असताना संपूर्ण जबाबदारी शासनावरच आहे.
👉 त्या प्रसंगी मी स्वतः उपस्थित राहून अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाच्या निष्काळजीपणाविरोधात कठोरपणे भूमिका घेतली.
👉 त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
✊ हा लढा केवळ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नाही, तर जनतेच्या आरोग्याच्या हक्काचा प्रश्न आहे. शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशासह मागण्या तातडीने मान्य करणे ही त्यांची पवित्र जबाबदारी आहे. अन्यथा, कर्मचाऱ्यांचा आणि जनतेचा रोष अनिवार्यपणे प्रकट होईल.
मागण्या:
1️⃣ औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तातडीने पालन करा.
2️⃣ १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा.
3️⃣ अंमलबजावणी होईपर्यंत समान काम, समान वेतन लागू करा.
4️⃣ NHM अधिकारी व कर्मचार्यांना त्वरीत वेतन देण्याची हमी द्या, अन्यथा कठोर आंदोलन अनिवार्य होईल.
आमदार मा. श्री. संजय पुराम, आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र





Total Users : 879218
Total views : 6482663