
भंडारा : भंडारा नगर परिषदेचे वरिष्ठ नेता माजी नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश वेळी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर व शिवसेना जिल्हा अध्यक्ष अनिल गायधने, युवा सेना प्रमुख जॅकी रावलानी यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला. माजी नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. बाबू बागडे हे गेल्या सात रेझीम पासून निरंतर नगर सेवक या पदावर निवडून येत असून त्यांनी दोन वेळा नगराध्य पद प्राप्त केले होते. भंडारा नगर परिषदेच्या राजकारणात बाबू बागडे हे नावाजलेले व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या या अनुभवाचे शिव सेनेला येत्या नगर परिषद निवडणुकीत मोठा लाभ होणार असल्याची चर्चा केली जात आहे. त्यांच्या प्रवेशच्या वेळी माजी नगर सेवक नितीन धकाते, माजी नगर सेवक बंटी मिश्रा, संजू नागदेवे, छोटू भुरे, आशु वंजारी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.





Total Users : 879218
Total views : 6482663