
आमगाव: देवरीतील सार्वजनिक बहुद्देशीय न्यू बालगणेश उत्सव मंडळ, संजय नगर तसेच श्री नवयुवक किसान गणेश मंडळ, गणेश चौक येथे भेट देऊन गणरायांच्या चरणी नतमस्तक झालो. त्याप्रसंगी मंडळात मा. श्री. संजयजी ऊईके (भाजप तालुकाध्यक्ष, देवरी), प्राचार्य मा. श्री. सुजीतजी टेटे (ब्लुमसूम शाळा, देवरी), मा. श्री. विनोदजी भेंडारकर (माजी तालुका महामंत्री, भा. ज. पा. देवरी), तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तिभाव, सांस्कृतिक परंपरा आणि समाजातील एकोप्याचे दर्शन या मंडळांतून घडले. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजाला दिशा देणारी एक प्रेरणा आहे. भजनी रंगले, कीर्तन झाले, आरतीच्या स्वरांत मन तृप्त झाले… गणरायाच्या चरणी प्रत्येक भक्त एकरूप झाल्याचे दर्शन लाभले. ✨
🙏 गणराया, जनतेच्या सुख-समृद्धी व मंगलमय भवितव्यासाठी अशीच कृपा राहू दे. गणपती बाप्पा मोरया! 🚩
आमदार मा. श्री. संजय पुराम, आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र





Total Users : 879218
Total views : 6482663