BREAKING NEWS
ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर) प्रयागराज में सामूहिक विवाह ,अखिल भारतीय कवि सम्मेलन: कैलाशी शिव चरण हांड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन
ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर) प्रयागराज में सामूहिक विवाह ,अखिल भारतीय कवि सम्मेलन: कैलाशी शिव चरण हांड़ा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बाल दिवस पर बच्चों ने पीस पोस्टर प्रतियोगिता में बढ चढ कर हिस्सा लिया: पंकज राजाभोज झांसी के तत्वाधान में कलचुरी कलार समाज झांसी एवं भूतपूर्व सैनिकों के संगठन के द्वारा 06 दिसंबर 2025 को सर्वजातीय गरीब परिवारों की 55 कन्याओं का सामूहिक विवाह सम्मेलन विकास के लिए जनता महायुति को चुनेगी मुख्यमंत्री फडणवीस ने कहा, निधि को लेकर कोई भेदभाव नहीं: आ. डॉ. परीनय फुके हर शहर के लिए ठोस विकास की योजना तैयार “CM का प्रतिपादन अफवाह से रहे दूर रहे” भंडारा के विकास कार्य के लिए धन की कोई कमी नहीं होने दूंगा नानाभाऊ पटोले, पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल, दिलीपभाऊ बन्सोड एवं सांसद डॉ. प्रशांत पडोले के नेतृत्व में सचिन गोविंदभाऊ शेंडे ने गोंदिया नप नगराध्यक्ष पद हेतु दाखल किया नामांकन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

समाज जागृती लेख “कर्मवीर भाऊराव पाटील — शिक्षण व समाजजागृतीचे प्रकाश स्तंभ”

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करीत आहोत. त्यांनी केलेले कार्य आणि मांडलेले विचार हे केवळ ऐतिहासिक आठवणीपुरते मर्यादित न ठेवता आजच्या काळातही तितकेच उपयुक्त व मार्गदर्शक आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे.

गरीबीच्या पार्श्वभूमीवर जन्मलेला विचारवंत:-  कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती दारिद्र्याने ग्रासलेली होती. पण या प्रतिकूलतेतूनच त्यांच्यातील जिद्दीला धार मिळाली. शिक्षण व सामाजिक उन्नती हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे त्यांनी आयुष्यभर पाळले. त्यांनी कष्टाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतः कष्ट करूनच इतरांना शिक्षणाची दारे उघडता येतात, हा त्यांचा ठाम विश्वास होता.

शिक्षणाचा लोकशाही दृष्टिकोन:- 

त्यांचे ब्रीदवाक्य “शिका आणि शिकवा, कष्ट करा आणि कष्ट करणाऱ्यांना शिक्षण द्या” आजही तितकेच सुसंगत आहे.

शिक्षण हे काही विशिष्ट वर्गापुरते मर्यादित न राहता सर्वांसाठी खुले असले पाहिजे, हा लोकशाही दृष्टिकोन त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवला. ग्रामीण भागातील मुले, गरीब शेतकरी, मजूर, दलित, बहुजन व स्त्रिया— या समाजघटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणे हे त्यांनी आयुष्याचे ध्येय मानले. त्यामुळे शिक्षणाचे लोकशाहीकरण खऱ्या अर्थाने घडवून आणणारे ते अध्वर्यू ठरले.

समाजजागृतीचा दीपस्तंभ:- कर्मवीर भाऊराव पाटील केवळ शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर समाजजागृतीचे दीपस्तंभ होते. जातिभेद, अस्पृश्यता, धार्मिक अंधश्रद्धा व स्त्रीविरोधी मानसिकता याविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्या काळात स्त्रीशिक्षणाला सामाजिक मान्यता मिळणे कठीण होते, पण त्यांनी निर्भयपणे स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा पुरस्कार केला. शिक्षण हे सामाजिक समतेचे साधन आहे, ही त्यांची भूमिका केवळ विचारांत मर्यादित नव्हती, तर कृतीतूनही ती त्यांनी सिद्ध केली.

आजच्या काळातील संदर्भ:- आज आपल्याकडे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अजूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचलेले नाही. शिक्षणाची संधी असूनही रोजगाराची हमी नाही, ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढते आहे, शेतकरी व मजूर वर्ग आजही समस्यांच्या गर्तेत आहे. अशा परिस्थितीत भाऊराव पाटलांच्या विचारांचे स्मरण करणे ही केवळ औपचारिकता न ठरता कृतीची दिशा ठरली पाहिजे. शासनाच्या धोरणांमध्ये आणि प्रशासनाच्या अंमलबजावणीत त्यांच्या विचारांची तत्त्वे रुजली तरच शिक्षण खरी जीवनदृष्टी देऊ शकेल.

शिक्षण आणि रोजगाराचे आव्हान:- आजची तरुणाई मोठ्या प्रमाणावर शिक्षित आहे; मात्र रोजगाराच्या संधी अपुऱ्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारसरणीप्रमाणे शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असले पाहिजे. त्यांनी दिलेला “कष्टमूल्याचा धडा” तरुण पिढीने अंगीकारला तर आत्मनिर्भरता वाढेल. शासनाने कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे.


समाजात विषमता टिकून आहे. आधुनिक तंत्रज्ञान असूनही अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक भेदभाव आपल्याला मागे खेचतात. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याची खरी प्रेरणा घेणे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून या समस्यांवर मात करणे. शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि समाजातील सुजाण घटकांनी या दिशेने पुढाकार घ्यायला हवा.

भविष्याची दिशा:- आज आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात उभे आहोत. मात्र या प्रगतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल तर शिक्षणात समता आणि गुणवत्ता आणणे आवश्यक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दाखवलेली वाट म्हणजे ज्ञानासोबत कष्ट, शिक्षणासोबत संस्कार, आणि समाजासोबत समता. हीच वाट आजच्या भारताला भविष्याकडे नेणारी ठरू शकते.

अपेक्षा:-  कर्मवीर भाऊराव पाटील हे फक्त व्यक्ती नव्हते, तर विचारांचे आंदोलन होते. त्यांच्या जयंतीदिनी फक्त अभिवादन न करता त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष कृती करणे ही काळाची गरज आहे. शासनाने धोरणांत, प्रशासनाने अंमलबजावणीत आणि जनतेने जीवनशैलीत त्यांच्या विचारांचे अंगीकारण केले तरच खरी “ज्ञानक्रांती” घडेल. भाऊराव पाटलांची जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ हाच — शिक्षण व समाजजागृतीचा दीप सतत प्रज्वलित ठेवणे. हिच अपेक्षा!

राहुल डोंगरे, शिवाजी नगर तुमसर, जि. भंडारा. मो. न.9423413826

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:55 pm, Dec 12, 2025
temperature icon 28°C
clear sky
16 %
1012 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 5:52 pm

Our Visitor

8 7 9 7 8 4
Total Users : 879784
Total views : 6483690

Our Visitor

8 7 9 7 8 4
Total Users : 879784
Total views : 6483690
error: Content is protected !!