
तिरोडा: तालुक्यातील मुंडीकोटा येथे आमदार मा. विजय रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत आबादी जागेवर वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना शासनाच्या नियमांनुसार निशुल्क पट्टे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानाचा कायदेशीर हक्क प्राप्त झाला असून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळत आहे.कार्यक्रमास जि.प.सदस्य किरण पारधी, चत्रभूज बिसेन, प.स.सदस्य वनिता भांडारकर, सरपंच प्रतिमा जैतवार, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार नारायण ठाकरे , मा. कृउबास उपसभापती विजय डिंकवार, तालुका बालविकास अधिकारी विनोद चौधरी महसूल विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाद्वारे शासनाच्या “सेवा हीच संधी” या भावनेतून नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पूर्तता करण्याचे कार्य आमदार मा. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने सातत्याने सुरू आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663