
तुमसर : जगगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीजधामच्या वतीने तुमसर शहरात घटस्थापनेपासून तर नव दिवस नवदुर्गा पेंडाल मध्ये व आजूबाजूचा परिसरात स्वछता अभियान राबवण्यात आला, या दरम्यान संस्थेचे पदाधिकारी व सेवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेत परिसर स्वच्छ केले.नवदुर्गा मध्ये रोज रोज रात्री भाविकांची गर्दी नवदुर्गा पेंडल मध्ये पहावयास मिळते त्यादरम्यान येणारे नागरिक भाविक प्रसाद, खाण्याचे साहित्य, त्याचे पाऊच हे रस्त्यावर टाकून देत असतात.त्यामुळे नवदुर्गा पेंडल च्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जमा होत असतो त्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज च्या वतीने तुमसर शहरातील नवदुर्गा पेंडल परिसरात त्यांच्या महिला सेवकांनी हातात झाडू घेऊन महाराजांच्या विचारावर पाऊल ठेवत शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवत अनेक पेंढाल मध्ये स्वतः जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये सफाई अभियान राबवत समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा कार्य केला आहे यामध्येजगद्गुरु रामानंदाचार्य संस्थेचे तुमसर तालुका अध्यक्ष
– वंदना सुधीर मलेवार यांच्या सोबत. मालु बडवाईक. शारदा रमेश येरणे. माधुरी अशोक नागफासे. प्रभा बाबुराव लांजेवार. शांताबाई वंजारी. सुनिता मेश्राम. शारदा सेवकराम मरसकोले माधुरी रमेश तरोने निलु उबडहांडे यांनी सहकार्य केले.






Total Users : 879218
Total views : 6482663