
तुमसर: तुमसर नगराध्यक्ष पदासाठी शहरात चांगलीच उत्सुकता पहायला मिळत आहे.नगराध्यक्ष पदाचि उमेंदवारी मिळवण्याकरीता सर्वच पक्षातील दावेदार आपापल्या परिने प्रयत्न करीत आहेत. आरक्षण जाहिर होताच प्रसार माध्यमावर पोस्टर, बॅनर ची सुळसुळाट सुरु झाली असून इच्छुकांनी जनतेशी प्रत्यक्ष भेटी गाठी सुरु आहेत.मात्र पक्षातील उमेदवारी साठी व नगराध्यक्ष पदा वर वर्णि लागण्या करिता काही नावांची शहरात चर्चा सुरु असून,या निवडणुकीत विजयी होऊन गुलाल कोण उधडणार?या चर्चेला तुमसर शहरात उधान आलेले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडनुकीचा बिगुल वाजल्या पासून नगराध्यक्ष पदा साठी इच्छुकांची शहरात बॅनर,पोस्टर व प्रसार माध्यमावर चांगलिच रंगत पहायला मिळत आहे.काही उमेदवार एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत आपण केलेल्या कामांची नागरिकांना जाणीव करुन देत आहेत, तर काही उमेदवार निवडून आल्यास कशा प्रकारे शहराचा विकास साधाणार याची चर्चा करतांनी दिसून येत आहेत.त्यात भारतीय जनता पक्षातील इंजि.प्रदीप पडोळे माजी नगराध्यक्ष न.प.तुमसर,सचिन बोपचे माजी सभापति न.प.तुमसर,पंकज बालपांडे माजी सभापति न.प.तुमसर,आशिष कूकड़े, माजी नगर सेवक न.प.तुमसर,शिवसेना शिंदे गटातून सौ.कल्याणी भूरे,राष्ट्रवादी अजित पवार गाटातील योगेश सिंगनजुड़े हि नेतेमंडली नगराध्यक्ष पदाचे टिकिट मिळवण्याकरीता प्रयत्न करीत आहेत.निवडणुकीची तारीख आघापही जाहिर झाली नसली तरी टिकिट मिळवण्यासाठी सध्या सुरु असलेली धामधूम यामुळे ही निवडणुक खुप चुर्शीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.मात्र पक्ष आणि मतदार कुणाला आशीर्वाद देणार हे बघने औत्सयुक्याचे ठरणार आहे.





Total Users : 878793
Total views : 6481923