
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ डॉ. सुखदेव कटकर
तुमसर: मराठी ही केवळ बोली न राहता जीवनाला दिशा देणारी, संस्कृती जपणारी आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारी भाषा आहे. तिचे अभिजातत्व हे आपल्या सर्वांच्या भाषिक अस्मितेचे प्रतीक आहे. आता गरज आहे ती – मराठी अभिजात वारसा जपत आधुनिक काळाशी सुसंगत ठेवण्याची. अभिजात भाषेचा मान मिळविणे हा अभिमानाचा क्षण आहे, परंतु तो खरा ठरेल तेव्हाच जेव्हा आपण सर्वजण मराठीचा अभिमानाने वापर करू, तिच्या अभ्यासाला प्रोत्साहन देऊ आणि भावी पिढ्यांपर्यंत तिचा गौरवशाली वारसा पोहोचवू,” असे प्रतिपादन प्राचार्य राहूल डोंगरे यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथे मराठी अभिजात भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक दीपक गडपायले हे अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी कु. लिझा हेडाऊ व विद्यार्थी राम बोपचे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कु. यशस्वी समरीत हिने केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुकांक्षा भुरे, श्रीराम शेंडे, बेनिता रंगारी, नितुवर्षा मुकुर्णे, प्रीती सेलुकर, विद्या मस्के, संजय बावनकर, अशोक खंगार, अंकलेस तिजारे, श्रेया उरकुडे, नेहा बारई, बोरले, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर, झनकेश्वरी सोनवाणे, विद्या देशमुख, बंदिनी, मानकरबाई, दातेबाई आदींनी परिश्रम घेतले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भारत स्वच्छता मिशन अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्ताने मराठी अभिजात भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.





Total Users : 879218
Total views : 6482663