![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
संचालक/ देवरी/ संदेश मेश्राम
पोलीस अधिक्षक कार्यालय, कॉन्फरन्स हॉल गोंदिया येथे जिल्हा स्कुल बस सुरक्षा समिती ची बैठक मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात करण्यात आले होते.
आयोजित बैठकी मध्ये सर्वप्रथम सदस्य सचिव श्री.कर्पे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मागील बैठकित झालेल्या ईतिवृताचे वाचन करून त्यामधील सुचनांची पुर्तता करण्याकरीता संबंधीत शाळा- महाविद्यालयाचे प्रतिनिधींना आवश्यक सुचना दिल्या. ज्यामध्ये शालेय विद्यार्थांची ने-आण करण्याकरीता शासनाने ठरवुन दिलेल्या स्कुल बस चा वापर करण्यात यावा. इतर कुठल्याही वाहनातुन विद्यार्थांची ने-आण होणार नाही याबाबत स्कुल प्रशासनाने खबरदारी घ्यावी. तसेच स्कुल बस च्या वाहन चालक- परिचालक यांचे चारित्र्या बाबत संबंधीतांचे पोलीस विभागा कडुन चारित्र पडताळणी करून घ्यावी.
सदर समितीचे सदस्य श्री. जयेश भांडारकर, पोनि जिल्हा वाहतुक शाखा, गोंदिया यांनी उपस्थीत शाळा महाविद्यालय प्रतिनिधींना माहिती देताना ज्या स्कुल बसेस मध्ये 12 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील अश्या बसेस मध्ये महिला परीचालक ठेवावे महिला परिचालक यांनी विद्यार्थी खाली उतरतांना किंवा चढतांना स्वःता खाली उभे राहुन निरीक्षण करावे. जेने करुन बस चालक बस मागे पुढे करतांना दुर्घटना होणार नाही. यापुर्वी अश्या प्रकारच्या दुर्घटना झाले असुन त्यामध्ये समाजमन सुन्न झाले होते व संबंधीत शाळेबद्दल सुद्धा जन सामान्यमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच स्कुल बस मध्ये स्पीड गव्हर्नर ठेवावे. व मुख्यालयाच्या बाहेर जाताना स्कुलबस मध्ये जि.पी.एस प्रनाली त्वरीत सुरू करावी. शाळा सुरू व सुटतांना शाळेचे गेटसमोर विद्यार्थांची गर्दी होते व त्यावेळी तिथे जर स्कुलबस आली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याकरीता शाळा सुरू होतांना व सुटतांना शाळा प्रशासनाने त्याचे सुरक्षा रक्षक अश्या ठिकाणी उभे करुन संभावित दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच शाळा प्रशासनातर्फे घेण्यात येनाऱ्या पालक शिक्षक मिटींग मध्ये जर वाहतुक पोलीसांना बोलाविले तर एकाच वेळी पालक, विद्यार्थी, बस चालक, परिचालक यांना सार्वत्रीक प्रमाणात मार्गदर्शन करणे सुलभ होईल याबाबत माहिती दिली.
जिल्हा स्कुल बस सुरक्षा समितीचे अध्यक्ष मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी सांगीतले की, स्कुल बस अथवा ज्या वाहनां मध्ये विद्यार्थी बसलेले असतात अश्या वाहनांना दुदैवाने अपघात घडल्यास संबंधीत पालक व जनमान सांमध्ये संबंधीत शाळा प्रशासनाबद्दल रोष निर्माण होतो तसेच जनमानसां मध्ये शाळेची प्रतिमा खराब होते. म्हणुन शाळा प्रशासनाने त्यांच्या स्कुल बसची योग्य तपासणी करणे, वाहन चालक परिचालक यांची पोलीस विभागाकडुन चारित्र पडताडणी करुन घेणे तसेच वेळोवेळी अधिनस्त कवायत निर्देशक (पि.टी शिक्षक) कडुन स्कुलबस चालक परिचालक विद्यार्थी व पालकामध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजीत करावे.
त्याच प्रमाणे कुठल्याही स्कुल बसमध्ये विद्यार्थांचा लैंगीक अत्याचार होता कामा नये. त्यामध्ये शारीरीक स्पर्श अथवा छेडखानी होता कामा नये. त्याकरीता प्रत्येक स्कुल मध्ये महिला परिचालक ठेवावे जेने करुन मुलींमध्ये आत्मविश्वाश निर्माण होईल तसेच स्कुलबस मधील चालकाची चारित्र पडताडणी करुण घ्यावी. स्कुलबस मध्ये लैंगीक अत्याचार झाल्यास समाजामध्ये उद्रेक निर्माण होवुन संबंधीत शाळेबाबत नागरिक निदर्शने करतात व त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याकरीता स्कुल प्रशासना ने या बाबीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
तसेच गोंदिया शहरा मध्ये मध्यम वाहनांना तसेच स्कुल ,महाविद्यालय वाहनांना अडथडा निर्माण व अपघात होवू नये म्हणुन गोंदिया शहरात अवजड वाहनांना सकाळी 09.00 वा. ते रात्री 21.00 वा पर्यंत सर्च प्रकारची जड वाहतुकीला मनाई करण्यात आलेली आहे. अनेक वेळा राईस मील अशोशियशन व औद्योगीक प्रतिनिधी, गोंदिया जिल्हा ट्रक समितीचे अध्यक्ष यांनी प्रशासनाला जड वाहतुक प्रतिबंध वेळामध्ये सवलत मिळण्याबाबत विनंती केलेली आहे. परंतु प्रशासनाने त्यांची विनंती अमान्य केलेली आहे. यामुळे आता आपल्या सर्वांची सामुहीक जवाबदारी आहे की कुळल्याही प्रकारची दुर्घटना व अपघात स्कुल बसेस, स्कुल व्हॅन किवा इतर खाजगी वाहने ज्यामध्ये विद्यार्थीची ने आण होते त्यांना अपघात होता कामा नये याकरीता उपस्थीतांनी अत्यंत जबाब दारीने कर्तव्य पार पाडने आश्यक असुन बैठकिमध्ये दिलेल्या सुचनेचे पालन करावे.
समितीचे अध्यक्ष यांनी पुन्हा सांगीतले की त्यांच्या अवलोकनामध्ये असे आढळुण आलेले आहे की जे व्यवसाईक वाहन चालक आहेत त्यांना सुद्धा रस्त्यावर कश्या पद्धतीने वाहन चालवावे कोणत्या लेनचा वापर करावा, वाहन कुठे उभे करावे, वाहन कसे पार्क करावे याचे सुद्धा ज्ञान नाही. यावर समिती अध्यक्षांनी खंत व्यक्त करून संबंधीत विभाग प्रमुखाने व उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन शिबीर आयोजीत करून वाहन चालक / मालक यांना प्रशिक्षत करावे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यामध्ये वाहन चालक नागरीक यांचेमध्ये वाहतुक नियमांचे अज्ञान असल्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहेत. त्याकरीता जिल्हा वाहतुक विभाग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय शहराचे मुख्य बाजारपेठ महत्वाचे चौकात, नुक्कड सभा चर्चासत्र व मार्गदर्शण शिबीर आयोजीत करून विद्यार्थ्यांमध्ये, नागरीकां मध्ये वाहतुकिंच्या नियमां बद्दल जनजागृति करावे.
समितीचे अध्यक्षांनी शाळा प्रतिनीधी, उपस्थीत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आवाहन केले की जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांचे सहकार्याने व त्यांचेसोबत समन्वय साधुन स्कुल बस चालक खाजगी वाहन चालक सर्व प्रकारचे सार्वजनिक वाहन चालक यांचेसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करून त्यांची नेत्र तपासणी करावी व योग्य वाहन चालकांना प्रमाणपत्र वाटप करूण घ्यावे. जेणे करून वाढत्या अपघाता ला प्रतिबंध करणे सोपे जाईल.
सभेमध्ये उपस्थीत शाळा प्रतिनिधी यांनी सुद्धा त्यांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणी बाबत माहिती दिली. त्यावर अध्यक्षांनी संबंधीत विभागाकडुन अडी-अडच नीचे निराकरण करण्यात येईल याबाबत सांगितले.
सभेचे सदस्य सचिव श्री. कर्पे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सभेला मा. पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी मार्गदर्शन केल्याबाबत आभार व्यक्त करून मा. अध्यक्षांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचा ग्वाही दिली. व सभा 13.30 वा. संपवीण्यात आली.
माननीय पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या बैठकी मध्ये जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीचे सदस्य सचिव तथा उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. करपे समितीचे सदस्य श्री जयेश भांडारकर पोनि जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया. तसेच प्रशासनाचे वेगवेगळ्या विभागाचे प्रतिनीधी, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ गोंदिया, गोंदिया शहर व जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थीत होते