![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
संचालक/ गोंदिया/ संदेश मेश्राम
संयुक्त राष्ट्राच्या वतीने २६ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त चिचगड पोलिसांच्या वतीने अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी चिचगड सह ग्रामीन भागात जनजागृती करण्यात आली. गावातील विविध ठिकाणी पथनाट्ये, रॅलीसारखे कार्यक्रम घेतले गेले. या कार्यक्रमात सहभागी पोलिसांनी व शहरातील नागरिकांनी अमली पदार्थाच्या सेवनाच्या विरोधात शपथ घेतली.
चिचगड पोलिसांच्या वतिने पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील शेकडो नागरीकांसमोर पोलिस विभागातर्फे जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन त्यांना अमली पदार्थांचे सेवन न करण्याबाबातची शपथ देण्यात आली. या रॅलीत चिचगड पोलिस ठाण्याचे ठानेदार शरद पाटिल , पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
दि.28/06/2023 रोजी मुस्लिम धर्मीय समाजाच्या बकरी -ईद सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच गावात शांतता राहावी यासाठी बंदोबस्त अनुशंगाने मा.ठाणेदार साहेब पो.स्टे. चिचगड,सपोनि. शरद पाटील साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली बस स्टॉप चौक चिचगड, दुर्गा चौक, झेंडा चौक, इंदरा नगर, मुख्य बाजारपेठ व मस्जिद परिसर या ठिकाणी दंगा काबू, रंगीत तालीम व रोड मार्च काढून ईद-दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी व जनतेने याबाबत जागरूक राहून सहकार्य करावे असे आव्हान मा.ठाणेदार, सपोनि.शरद पाटील यांनी केले, तसेच मोहल्ला कमिटी व शांतता समिती यांची बैठक घेऊन त्यांना त्याअनुषंगाने योग्य त्या सूचना देऊन परिसरात तसेच सोशल मीडिया इत्यादी बाबत सतर्कता बाळगावी व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबतीत काळजी घ्यावी असे आवाहन चिचगड पोलिसां तर्फे करण्यात आले.