![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील सोशल मीडिया प्रभारी , महाराष्ट्र मिडिया समन्वयक , विभागीय व जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती केली आहे.
यामध्ये भंडाऱ्या जिल्ह्यातून माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचे कट्टर समर्थक हेमंत मलेवार यांची निवड भंडारा जिल्हा सोशल मीडिया समन्वयक पदी करण्यात आली.
हेमंत मलेवार यांनी संपूर्ण निवडीचे श्रेय BRS पक्षाचे नेते श्री. चरण भाऊ वाघमारे तसेच सर्व BRS पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिलं ….
बीआरएस पक्षाचे नवनियुक्त भंडारा सोशल मीडिया समन्वयक हेमंत मलेवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सोशल मीडिया टीमची पहिली यादी राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी प्रकाशित केली आहे. येत्या काही दिवसात आम्ही आणखी लोकांना टीममध्ये जोडणार आहोत आणि सोशल मीडिया टीममध्ये गाव आणि वार्ड स्तरावर लोकांची नियुक्ती करणार आहोत. आता बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचला आहे. आम्ही तेलंगणाचे विकसीत मॉडेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आठ ते नऊ वर्षांत जे काम केले आहे त्याबद्दल जनजागृती करत आहोत. येत्या काळात सोशल मीडिया माध्यमातून आम्ही महाराष्ट्र बरोबर संपूर्ण देशभर बीआरएस पक्षाचे जाळे तयार करून महाराष्ट्रात सरकार बनवणे त्याचप्रमाणे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार बनविण्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहोत.