तुमसर/ तुषार कमल पशिने
महाराष्ट्र सरकारने घेतला पुन्हा एकदा भारत राष्ट्र समितीचा धसका – परमानंद कटरे
भारत राष्ट्र समिती चे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला यासाठी महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून सरकार स्थापन करून सर्व स्तरावरील घटकांना न्याय देण्याचं संकल्प केला.
पण निवडणुकाच आमच्यासाठी महत्त्वाचे नाही हे सुद्धा स्पष्टपणे तेलंगणा प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी सांगितलेले आहे…. जर महाराष्ट्र सरकार तेलंगणातल्या योजना लागू करणार असणार तर आम्ही कुठल्याही प्रकारची निवडणूक महाराष्ट्रात लढणार नाही ही भूमिका तेलंगणाच्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे……
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सततच्या होणाऱ्या सभा तसेच पक्ष बांधणीसाठी होणारे माजी आमदार,खासदार यांचे पक्ष प्रवेश याचाच धसका महाराष्ट्र सरकारने घेतला अस दिसून येत आहे…त्याचाच परिणाम की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत संजय गांधी निराधार योजना मधे वाढीव रक्कम देण्याचं निर्णय राज्य सरकारने दिलं…तसेच तेलंगणाच्या धर्तीवर जनहिताचे विविध निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यावे लागले हा भारत राष्ट्र समिती पक्षाचं विजय आहे.
परमानंद कटरे माजी सरपंच सदस्य , भारत राष्ट्र समिती