![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
भंडारा:- फेब्रुवारी 2023 ला राज्य सरकार मार्फत सीटीईटी आणि टीईटी पास झालेल्या भावी शिक्षकांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. चाचणी घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांच्या रिजल्ट सुद्धा लागला मात्र अजून पर्यंत राज्य सरकारने शिक्षक भरती घेतलेली नाही यात राज्य सरकारने नवीन जीआर काढून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा 20 हजार रुपये मानधन तत्वावर रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय भावी शिक्षकांसाठी अन्यायकारक असून बेरोजगारीचे प्रमाण राज्यात वाढले आहे तसेच नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात न्यायालयात दाखल रिट याचिकामुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याचे कारण पुढे करीत नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षक संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे आदेश अभियोगीता धारक भावी शिक्षकांची थट्टा करणारे असून जिल्हा परिषद शाळेत सेवा तत्वावर निवृत्त शिक्षक यांना घेण्याऐवजी बेरोजगार युवकांना संधी द्यावी आणि पवित्र पोर्टल सुरू करण्यात यावे.अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाने केली असून या संबंधिचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.या प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते,महिलाध्यक्ष शोभा बावनकर,शिक्षक रवी ठवकर,यशवंत सूर्यवंशी,संयोजक जीवन भजनकर,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू बोपचे,तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे,धनराज साठवणे,पुथ्वीराज तांडेकर आदी उपस्थित होते.