![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातुर जिल्हा प्रतिनिधी / नवनाथ डिगोळे
दि.३१/०७/२०२३ रोजी मौ आटोळा ता चाकूर येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत सोयाबीन शेतीशाळा चा दुसरा वर्ग संपन झाला, या कार्यशाळेत प्रत्यक्ष सोयाबीन प्रक्षेत्रावर भेट देऊन शेतकऱ्यांना अन्न द्रव व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, फवारणी करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी,खोडकीड,चक्री भुंगा,पाने खाणारी आळी, इत्यादी कीड व रोग यांची ओळख व नियंत्रण यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी या कार्यशाळेस घोसे डी.एल. तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थाप मस्के प्रदीप, आटोळा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक शैलेश कुमदाळे व शेतकरी आदिनाथ भडके ,राजेश गंगापुरे ,दगडूसाहेब उजेड ,वैजनाथ स्वामी तानाजी कुमदाळे व अनेक शेतकरी उपस्थित होते