
तुमसर/ जिवन वनवे
तुमसर येथे आयोजित बहुआयामी असलेला क्रिडा प्रकार “किक बॉक्सिंग” या खेळाचे दिनांक ०९जुलै २०२३ रोज रविवार ला एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रतीयोगितेचे आयोजन अटल बिहारी वाजपेयी क्रिडा संकुल, नेहरू ग्राउंड तुमसर येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. राजुभाऊ कारेमोरे होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजि. नितिन धांडे यानी स्पर्धा विजेता खेळाडूंना पारितोषिक वितरण केले व उपस्थितांना संबोधित केले. भंडारा जिल्हा स्तरावरील खेळाडूंना या क्रिडा प्रकाराची ओळख करून देणारे व येथील खेळाडूंना देश पातळीवर नेऊन सुवर्ण पदकाचे मानकरी करणारे भंडारा जिल्हा किक बॉक्सिंग सचिव श्री.मयूर नागमोते, पंच कमेटी निरीक्षक श्री.हेमंत चावके व त्यांच्या संपुर्ण टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच. त्यांच्याच अथक परिश्रमाचे फलित हे स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्यक्षदर्शी स्पर्धकांच्या लकबीवरून दिसत होते.





Total Users : 883116
Total views : 6488555
