तुमसर/ तुषार कमल पशिने
तिरोडा:- तिरोडा क्षेत्रात विकास सिंचन विकास व रोड रस्ते विकासकामांवर विश्वास ठेवत वडेगाव येथील कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये प्रामुख्याने राजकुमार फुलचंद पटले ग्रा.प.सदस्य राष्ट्रवादी तसेच प्रदीप गौतम कॉंग्रेस पक्ष यांचा समावेश आहे पक्ष प्रवेशावेळी आमदार महोदयांच्या हस्ते भाजपचा दुपट्टा घालून व पुष्प्गुछ देवून सत्कार करण्यात आला यावेळी प्रामुक्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले, सरपंच शामराव बिसेन, प.स.सदस्य तेजराम चव्हाण, वडेगाव प.स.प्रमुख भरत गुरव, अंकुश राठोड, शहर माहामंत्री दिगम्बर ढोक, दैनिक लोकजन पत्रकार भरत बिसेन, गराडा उपसरपंच वेंकट रेवत्कार उपस्थित होते.