![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अर्जूनीमोरगाव/ अविनाश मेश्राम
सरकारच करते तरुणांना बेरोजगार : सेवानिवृत्तीवाले मरेपर्यंत शिक्षक, आणि बेरोजगार ??
“तीन ती गाळा, काम बी गाळा” करणारे सरकार आता महाराष्ट्र राज्यात आहे. हे शासन विकासाचे कोणतेच पाऊल चांगले उचलत नाही. आता तर कमालच केली या सरकारने सेवानिवृत्तीधारक व पेन्शनधारकांनाच पुन्हा शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले. हे किती दुर्भाग्य महाराष्ट्र राज्यातील शिक्षीत तरुणांचे ? आता अशा प्रकारच्या निर्णयामुळे आम्ही मास्तरकिच्या पदव्या विकायच्या काय ?? असा सवाल करावाच लागतो.
महाराष्ट्रातील शहरात आणि गावातही आता हल्लीचे तरुण हे डी एड, बी एड, एम एड तसेच पीएच डी सारख्या व्यवसायीक पदव्या व बी ए, एम ए अशाही पदव्या मिळवून समाजातील सुजाण नागरिक घडविण्यासाठी तडफड करत आहे, पण एकीकडे शासन नवनवीन विणाकारणाचे फतवे काढून शिकलेल्या तरुणांचे स्वप्न चकनाचूर करते. हे अडाणचोट सरकार आहे काय ? भारत सरकार रेल्वे विकतो, विमान विकतो, पोस्ट खाते विकतो, बँका विकतो, तर काही भागात शिक्षणाचे बरेच क्षेत्र ही विकायचे ठरवत आहे, ते सुद्धा २०२४ ला विकण्याचे ठराव तयार करत आहे.
ज्या सेवानिवृत्ती व पेन्शन धारकांना विश्रांती गरज आहे त्या लोकांना हे जिल्हा परिषद विभागाची पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी वीस हजार पगार देऊन त्यांना मरेपर्यंत शिक्षक बनवून घेते जसे यांनी ठेका घेतलाय का शिक्षकीपेशाचा असाही सवाल आता शिक्षीत बेरोजगार करत आहेत. अशांना कामावर घेऊन चांगलीच बेरोजगारी निर्माण करणे सुरू झाले. सेवानिवृत्ती व पेन्शन धारकांना शिक्षक म्हणून कामावर रुजू करणे हे अशोभणिय कार्य आहे. यांनी भानावर यावे.
शासनाने अत्यंत चुकीचे धोरण आहे, म्हातारपणात काम देणे, हे शोभत नाही. त्यांना आराम दयावा, आज मी डब्बल एम ए, बी एड, डी एड आहे, गोंडवाना विद्यापीठात येथे पीएच डी करत आहे, तरी सुद्धा शिक्षक म्हणून घ्यायला तयार नाहीत. आम्ही उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊ शकतो, चांगले घडवू शकतो व संस्काररुपी व्यक्ती घडविण्याचा अंगी कला गूण आहे.
:-मुन्नाभाई नंदागवळी, येरंडी-बाराभाटी
शिक्षक भरतीच्या नावावर राजकीय फंडा
जिल्हा परिषद शाळेतील अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणून तरी शिक्षक भरती करत नाही. शिक्षक भरतीच्या नावावर एनजीवोंना भरती प्रक्रिया करायला लावून अनेक बेरोजगारांचे पैसे उकडणे सुरू केले. कंपनी मार्फत खाजगीकरण करून भरती काढणे व नोकरीचा लालसा देणे हे राजकारणातील राजकीय फंडा वापरतात. हे चुकीचे आहे. नेत्यांमूळे ही अवस्था झाली.
रिक्त जागांसाठी तरुणांना संधी दया.
अनेक जिल्हा परिषद, शासकीय निवासी शाळा, शासकीय व खाजगी आदिवासी आश्रमशाळा, वस्ती शाळा, या शाळांमध्ये अनेक विषयाच्या शिक्षकांची गरज आहे, अशावेळी उत्साही, उपक्रमशिल शिक्षीत, शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक अर्हता धारण करणारे तरुणांना संधी दयावी, म्हणजे उदया निर्माण होणारे विद्यार्थी हे चांगले व्यक्तिमत्त्व घडतील.
सेवानिवृत्ती, पेन्शनधारकांना घेऊ नका.
५८ वर्षापर्यंत नोकरीत होते, त्यांना आराम दया, त्यांना समाधानी राहू दया, कारण त्यांच्या मानसिकतेचा विचार करा. त्या लोकांना पेन्शन लागू आहे. ते आपला व परिवाराचा पोट सहज भरतात पण बेरोजगाजगारांचा काय ??? याचा विचार करून सेवानिवृत्ती धारकांना व पेन्शनधारकांना कामावर शिकविण्यासाठी घेऊ नका असी आर्तहाक तरुण करतात.
तरुणांना लॉलीपॉप नको नोकरी दया.
सद्या तर राजकारजाहीरात काढून शिक्षीतांना नुसते लॉलीपॉप देणे सुरू आहे. हे बंद करा सरसकट नोकरी दया अशी मागणी गावातील तरुण करीत आहेत.