तुमसर/ तुषार कमल पशिने
जवाहरनगर- आयुध निर्माणी ला भेट- खासदार श्री.सुनील बा. मेंढे
जवाहरनगर येथील आयुध निर्माणी भंडारा येथे आज भेट दिली. यावेळी आयुध निर्माणी येथील कामगार आणि ग्रामपंचायतीच्या असलेल्या अडचणींच्या दृष्टीने निर्माणीच्या महाप्रबंधकांशी चर्चाही केली.
भंडारा येथील आयुध निर्माणीत काही विशिष्ट स्फोटके संपूर्ण भारतात भंडारा येथे तयार होतात. अशा आयुध निर्माणीला भेट देण्याचा योग म्हणजे गौरवाची बाब असे सांगितले. यावेळी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी स्फोटके तयार होतात, अशा विभागाला भेट दिली. या भेटीनंतर कामगार आणि विशेष करून भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर ग्राम पंचायतीचे काही विषय समजून घेत निर्माणीच्या महाप्रबंधकांची भेट घेत चर्चा केली. असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, कामगारांना काम करताना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने नियोजन करावे आणि अन्य बाबींवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी भाजपा पदाधिकारी व निर्माणीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.